परळी // आर्य समाजजवळील रोडेचौक येथे उभ्या असलेल्या  स्विफ्ट कारमधुन भरदिवसा 1 लाख 20 हजार रुपये चोरी झाले
रसवंती गृहाबाजूला आपली चारचाकी गाडी लावून रसवंतीत  रस घेऊन बाहेर येताच गाडीचा काच फुटल्याचे लक्षात आले.तेव्हा गाडीच्या डिक्कीत ठेवलेले एक लाख वीस हजारची रक्कम ही लंपास झाल्याची घटना घडली.

 वैद्यनाथ बँकेतुन एफडीची एक लाख वीस हजारची रक्कम घेऊन एसबीआय बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या ग्राहकाला बँकेचे नेट सध्या खराब आहे सांगितल्याने त्याच परिसरात असलेल्या.

अधिक माहिती अशी कि ज्ञानेश्वर दताञय कुरुडे नामक ड्रायव्हर आपली वैद्यनाथ बँकेत एक लाख विस हजारची एफडीची रक्कम मोडुन आपल्या MH-14-CX-4917 या चारचाकी वाहनाच्या डिक्कीत ठेऊन एसबीआय बँकेत भरणा करण्यासाठी निघाले तेव्हा एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेचे नेट बंद आहे तुम्ही उद्या या असे सांगितले म्हणुन ज्ञानेश्वर दताञय कुरुडे आणि इतर दोघेजण रस घेण्यासाठी गाडी समोरच पार्किग करुन एका रसवंती गृहात रस घेण्यासाठी गेले असता.ही चोरीची घटना घडली.

शहरात सर्वत्र सिसीटीव्हीची कँमेरे बसवण्यात आले असताना माञ तरीही  परळीत चोरांचा सुळसुळाट वाढला आहे.सदरील घटना परळीच्या वर्दळीच्या ठिकाणी मोंढामार्कट मध्ये झाली आहे.पुढील तपास परळी पोलिस करीत आहेत .